शेतकर्यांवर मानवनिर्मित संकट भारत भालके : टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावर भोसे चौकात रस्ता रोको आंदोलन
By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST
१७पंड०४
शेतकर्यांवर मानवनिर्मित संकट भारत भालके : टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावर भोसे चौकात रस्ता रोको आंदोलन
१७पंड०४भोसे (ता. पंढरपूर) येथील टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावर उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्यासह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आ. भारत भालके, उपस्थित जनसमुदाय.नेमतवाडी : उजनी धरणाच्या निर्मितीपासून धरण वजा ३० टक्क्यांपर्यंत असताना शेतकर्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून आजपर्यंत १३ वेळा पाणी सोडण्यात आले होते. आज मात्र धरणात वजा साडेसहा टक्के पाणीसाठा असताना उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत शासनाकडून उदासीनता असल्यामुळे शेतकर्यांवर निसर्गाच्या संकटापेक्षा शासन मानवनिर्मित मोठे संकट आणू पाहत असल्याचा आरोप आ. भारत भालके यांनी केला.भोसेपाटी (ता. पंढरपूर) येथे टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावर विविध मागण्यांसाठी काँग्रेसने रस्ता रोको करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. बबनराव शिंदे, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, विठ्ठलचे संचालक राजूबापू पाटील, विठ्ठलचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, मोहन कोळेकर, नरसाप्पा देशमुख, भगीरथ भालके, दशरथ खळगे, कांतीलाल भिंगारे, बिभीषण पवार, रामदास चव्हाण, चांगदेव कदम, विजयसिंह देशमुख, युवराज पाटील, तात्यासाहेब पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, रावसाहेब पाटील, उपसरपंच शेखर पाटील उपस्थित होते.आ. बबनराव शिंदे यांनी शेतकर्यांच्या जळालेल्या पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई देण्यात यावी, चारा छावण्या त्वरित सुरू करून पशुधन जगवावे, जिल्ात १०० टक्के अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. या आहेत मागण्याउजनीच्या कालव्यातून पाणी सोडावे, जिल्ात दुष्काळ जाहीर करून कर्ज व वीज बिल माफी करून जळालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, पिण्यासाठी टॅँकर सुरू करावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.