Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेजर सुभाष सासणेंची विक्रमाला गवसणी!

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

मेजर सुभाष सासणेंची विक्रमाला गवसणी!

मेजर सुभाष सासणेंची विक्रमाला गवसणी!
गगणभेदी घोषणा : चित्रीकरण वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुककडे पाठवणार
उस्मानाबाद : येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सोमवारी स्टेप अप्स आणि पुश अप्स या प्रकारात तब्बल चार विक्रम नोंदविले़ या विक्रमांचे चित्रीकरण लंडन येथील वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर विश्वविक्रमाची अधिकृत करण्यात येणार आहे़
सोमवारी सकाळी सासणे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली एक-एक करून हे चार विश्वविक्रम नोंदविले़ ते नोंदवित असताना सासणे यांनी प्रत्येक प्रकारानंतर पाच ते सात मिनिटे विश्रांती घेतली़ या विक्रमांचे चित्रीकरण लंडन येथील वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. हा विक्रम होत असताना उपस्थित खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांसह अधिकार्‍यांनी देशभक्तीपर गगणभेदी घोषणा देत सासणे यांना उत्स्फूर्त दाद दिली़ (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
पहिला विक्रम
४० पौंड वजन पाठीवर घेवून स्टेप अप्स या प्रकारातील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एका मिनिटातील ५२ स्टेपअप्सचा विक्रम मोडीत ५८ स्टेप अप्स काढले़
दुसरा विक्रम
तब्बल ८० पौंड वजन पाठीवर घेवून पुश अप्स या क्रीडा प्रकारातील ब्रीटनचा खेळाडू पैैडी डोएल याचा एका मिनिटात ३८ पुशअप्सचा विक्रम मागे टाकत ४२ पुशअप्स काढले.
तिसरा विक्रम
मेडीसीन बॉलवर त्रिज्या ठेवून काढण्यात आलेल्या जर्मनीच्या ग्रेगर श्रेगल याच्या नावावरील एका मिनिटातील ४७ पुश अप्सचा विक्रम मोडीत काढून ५५ पुशअप्स काढत विक्रमाची हॅट्रीक नोंदविली़
चौथा विक्रम
सासणे यांनी स्वत: विकसित केलेल्या एका हाताने पुशअप्स काढून टाळी वाजविण्याच्या क्रीडा प्रकारात एका मिनिटात ४५ पुशअप्स काढून प्रथमच विक्रम नोंदविला.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
फोटो
01ङ्मुस्रि16
फोटो ओळ
उस्मानाबाद येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सोमवारी स्टेप अप्स आणि पुश अप्स या प्रकारातील चार विक्रम नोंदविले़ यादरम्यान मेडिसीन बॉलवर पुशअप्स काढताना मेजर सासणे.