नाशिक : महिंद्रा ॲण्ड महिंद्राने स्थानिक टेक्निशीयन्सची क्षमता वाढविण्यासाठी मोबाइल स्कील डेव्हलपमेंट व्हॅन लॉँच केली आहे. या सुविधेमुळे कंपनी छोट्या कमर्शीअल वाहनांना कुठेही सर्व्हिस देऊ शकेल.जितेंद्र मोटर्स व कमल कारलाइन्स येथे या व्हॅनचे अनावरण करण्यात आले. ही व्हॅन पाच महिन्यांमधे सर्व १४ तालुक्यांतील टेक्निशीयन्सना कव्हर करेल.या प्रसंगी महिंद्राचे झोनल हेड राजीव वाळुंज, रिजनल कस्टमर केअर मॅनेजर आशुतोष दुग्गल, जितेंद्र मोटर्स व कमल कारलाइन्सचे सीएमडी जितेंद्र शहा व संदीप बोरसे आदि उपस्थित होते. (वा.प्र.)-----
महिंद्राची मोबाइल स्कील डेव्हलपमेंट व्हॅन लॉँच
By admin | Updated: March 31, 2016 00:16 IST