Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर

By admin | Updated: September 8, 2016 04:47 IST

भारतात सुलभतेने व्यवसाय करण्याच्या मुद्यावर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वोच्च स्थानी आहे.

सिंगापूर : भारतात सुलभतेने व्यवसाय करण्याच्या मुद्यावर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वोच्च स्थानी आहे. एका ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सिंगापुरातील एशिया काँपिटिटिव्ह इन्स्टिट्यूटने (एसीआय) यासंबंधी अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. व्यवसाय सुलभता, स्पर्धात्मकता, थेट विदेशी गुंतवणूक इ. अनेक पैलूंच्या बाबतीत राज्यांचा अभ्यास करण्यात आला. या सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून आले, हे विशेष. एसीआयचे रिसर्च फेलो शशिधरन गोपालन यांनी सांगितले की, भारतातील २१ राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास यात करण्यात आला. अभ्यासातील निष्कर्षानुसार, व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली एनसीआर, गोवा आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये आघाडीवर आहेत. स्पर्धात्मक वातावरणाच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहेत. थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक ही पाच राज्ये आघाडीवर आहेत. देशातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत या राज्यांचा वाटा ५0 ते ६0 टक्के आहे. अन्य राज्यांना थेट विदेशी गुंतवणूक वाढवून संतुलन निर्माण करावे लागेल. अन्यथा विकास ठराविक भागांतच केंद्रित होईल. (वृत्तसंस्था)