Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ देणार ३५ लाख जणांना रोजगार ; १० लाख कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:00 IST

रविवारपासून सुरू होणा-या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ही गुंतवणूकदार परिषद ३५ लाखांचा रोजगार निर्माण करण्यास सज्ज आहे. यामध्ये पाच क्षेत्रांवर ‘फोकस’ केला जाणार असून १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

- चिन्मय काळेमुंबई : रविवारपासून सुरू होणा-या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ही गुंतवणूकदार परिषद ३५ लाखांचा रोजगार निर्माण करण्यास सज्ज आहे. यामध्ये पाच क्षेत्रांवर ‘फोकस’ केला जाणार असून १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून मॅग्नेटिक महाराष्टÑ ही गुंतवणूक परिषद मुंबईत आयोजित केली आहे. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणाºया या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तीन दिवस चालणाºया या परिषदेची तयारी उद्योग विभागाकडून पूर्णझाली आहे.प्राप्त माहितीनुसार, या परिषदेत एकूण ४ हजार सामंजस्य करार होणार आहेत. त्यातून १० लाख कोटी रूपयांची (१५६ अब्ज डॉलर) गुंतवणूक व ३५ लाखांचा रोजगार अपेक्षित आहे. राज्य सरकारने या परिषदेद्वारे वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, संरक्षण उत्पादन व खाद्यान्न प्रक्रिया या क्षेत्रांवर ‘फोकस’ निश्चित केला आहे. मुख्य म्हणजे आजवर केवळ मोठ्या उद्योगांकडे लक्ष दिले जात असताना यंदा सुक्ष्म, मध्यम व लघु (एमएसएमई) उद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे उद्योग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.बड्या उद्योजकांची मांदियाळीबड्या उद्योजकांची मांदियाळी हे या परिषदेचे वैशिट्य ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि महिंद्राचे आनंद महिंद्रा यांच्याखेरीज विदेशी उद्योजकांची उपस्थिती विशेष ठरणार आहे. व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मॉन्सर, जगप्रसिद्ध कार कंपनीचे टोनिनो लॅम्बोर्घिनी हे विशेषत्त्वाने उपस्थित असतील. यासोबतच स्वीडनचे सचिव कॅरीन रोडिंग, कॅनडाचे लघु उद्योग मंत्री बार्दिश चॅग्गर तसेच नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हे उपस्थित असतील.‘मेक इन इंडिया’ त फार यश नाही !मोठा गाजावाजा करीत दोन वर्षांपूर्वी याच कालावधित मुंबईत घेण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ परिषदेतील ५५ टक्के प्रकल्प मार्गस्थ झाल्याचा दावा राज्य सरकार करीत आहे. प्रत्यक्षात मात्र ‘मेक इन इंडिया’ने फार यश मिळविले नाही. यामुळेच स्वदेशी कंपन्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी विदेशातून येणाºया मालावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आल्याचे मत स्वत: नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे.ठप्प ‘सेझ’चे काय?राज्यातील निम्म्याहून अधिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) ठप्प आहेत. यामध्ये एमआयडीसीच्या १९९ हेक्टरसह अन्य जवळपास २ हजार हेक्टर जमीन पडून असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. अशावेळी एकीकडे लाखो कोटी रूपयांची गुंतवणूक आणताना या सेझमधील पडून असलेल्या जमिनींचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.‘मॅग्नेटिक महाराष्टÑ’ असे : उद्घाटन : १८ फेब्रुवारी, एकूण कालावधी : तीन दिवस, एकूण करार : ४ हजार, गुंतवणूक अपेक्षित :१० लाख कोटी रू. रोजगार अपेक्षित : ३५ लाख, क्षेत्र : वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, संरक्षण उत्पादन, खाद्यान्न प्रक्रिया व एमएसएमई

टॅग्स :व्यवसाय