Join us

लक्स कोझीच्या सुगंधित बनियनचे लाँचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 04:33 IST

१४ प्रमुख ब्रँडस्मध्ये १०० उत्पादने देणाऱ्या लक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने देशातील पहिला सुंगधित बनियन (सेन्टेड व्हेस्ट) बाजारात उतरविला

मुंबई : १४ प्रमुख ब्रँडस्मध्ये १०० उत्पादने देणाऱ्या लक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने देशातील पहिला सुंगधित बनियन (सेन्टेड व्हेस्ट) बाजारात उतरविला असून, प्रख्यात चित्रपट अभिनेते वरुण धवन यांच्या हस्ते या बनियनचे लाँचिंग करण्यात आले. लक्स कोझी या ब्रँडखालीच हे बनियन कंपनीने आणले आहे.वरुण धवन हे लक्स कोझीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही आहेत. मुंबईत झालेल्या तारांकित लाँचिंग समारंभास वरुणसह लक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन अशोक तोडी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप तोडी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन तोडी यांची उपस्थिती होती. अशोक तोडी यांनी याप्रसंगी सांगितले की, लक्स इंडस्ट्रीजने अनेक उत्पादने या देशात पहिल्यांदा दिली आहेत. प्रदीप तोडी यांनी सांगितले की, नवे उत्पादन उन्हाळ्याच्या हंगामातही दिवसभर ताजेतवाने ठेवील. नवीन तोडी म्हणाले, बाजारातील बदलाचे नेतृत्व आम्ही केले आहे. वरुण धवन म्हणाले की, लक्स कोझी हे नाव गुणवत्ता, आराम, टिकाऊपणाला पर्यायवाचक आहे.