Join us  

स्वस्त झाला गॅस सिलेंडर, जून महिन्यात बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या नवा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 9:36 AM

LPG Gas Cylinder Price Today: एलपीजी ग्राहकांसाठी जून महिन्याच्या सुरुवातीलाच महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. १ जून रोजी सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे.

नवी दिल्ली - एलपीजी ग्राहकांसाठी जून महिन्याच्या सुरुवातीलाच महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. १ जून रोजी सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे. (LPG Gas Cylinder Price Today) आयओसीने १ किलोग्रॅम वजनाच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये ग्राहकांना दिलासा दिला आहे. (Commercial gas cylinder) मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. सग तिसऱ्या महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. दरम्यान १९ किलो वजनाच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये मे महिन्यातही कपात करण्यात आली होती. आयओसीच्या संकेतस्थळानुसार दिल्लीमध्ये १ जूनपासून १९ किलोग्रँम वजनाच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत १२२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुले आता या गॅस सिलेंडरची किंमत १४७३.५० प्रति सिलेंडर एवढी असेल. तर मे महिन्यामध्ये याची किंमत १५९५.५० रुपये एवढी होती. यापूर्वी मे महिन्यातही सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत ४५.५० रुपयांनी कपात केली होती. कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे नवे दर पुढीलप्रमाणे आहेत. - दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची नवी किंमत १४७३.५० रुपये एवढी असेल. - मुंबईत १९ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची किंमत १५४५ रुपयांवरून कमी होऊन १४२२ रुपये एवढी झाली आहे. - कोलकातामध्ये या सिलेंडरचे दर १६६७.५० रुपयांवरून कमी होऊन १५४४.५० रुपये एवढे झाले आहे. - तर चेन्नईमध्ये हे दर १७२५.५० रुपये प्रति सिलेंडरवरून कमी होऊन १६०३ रुपये झाले आहेत.मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये १४.२ किलो सिलेंडरची किंमत ८०९ रुपये आहे. तर कोलकातामध्ये ८३५.५ रुपये, मुंबईत ८०९ रुपये आणि चेन्नईत ८२५ रुपये एवढी किंमत आहे.  

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय