Join us  

LPG चे नवे दर जाहीर! महागला की स्वस्त झाला? घरगुती सिलेंडरची किंमत किती? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 9:21 AM

LPG Cylinder Price Latest Rate: ०१ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

LPG Cylinder Price Latest Rate: जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे आणि या महिन्यापासून अनेक नियम तसेच गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. यात आता एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गॅसच्या किमतीही गगनाला भिडलेल्या आहेत. ०१ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. 

इंडियन ऑइलनुसार, १४.२ किलो एलपीजी सिलेंडर आणि १९ किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत. सरकारने सातत्याने व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत ८३ रुपयांनी कपात करण्यात आली होती. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली होती. एका सिलेंडरची किंमत १८५६.५० रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत २०२८ रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक २११९.५० रुपये होती. 

देशातील चार प्रमुख शहरांमध्ये LPG चे दर किती?

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत १७७३ रुपये आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ११०२.५० रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७२५ रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ११२९ रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत १८७५.५० रुपये आहे. तर, चेन्नईमध्ये एक एलपीजी सिलेंडर १११८.५० रुपयांवर असून व्यावसायिक सिलेंडर १९३७७ रुपयांना विकला जात आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी ६ जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. 

टॅग्स :गॅस सिलेंडर