Join us

सेन्सेक्स आपटून २४ हजारांच्या खाली

By admin | Updated: January 22, 2016 03:12 IST

गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0 अंकांनी घसरून २३,९६२.२१ अंकांवर बंद झाला.

मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0 अंकांनी घसरून २३,९६२.२१ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा २0 महिन्यांचा नीचांक असून बाजार प्रथमच २४ हजारांच्या खाली गेला आहे. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,३00 अंकांच्या खाली गेला आहे.आशियाई बाजारांतील घसरण, ब्ल्यूचिप कंपन्यांत झालेली नफावसुली आणि रुपयातील घसरण ही घसरणीची प्रमुख कारणे आहेत. अनेक प्रमुख कंपन्यांचा तिमाही निकाल अजून यावयाचा आहे. त्यामुळेही बाजारात थोडी सावधानता दिसून आली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर त्याला नफा वसुलीचा फटका बसला. एका क्षणी तो २३,८६२.00 अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस ९९.८३ अंकांची अथवा 0.४१ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २३,९६२.२१ अंकांवर बंद झाला. १५ मे २0१४ नंतर सेन्सेक्स प्रथमच २४ हजार अंकांच्या खाली घसरला आहे. आदल्या दिवशीच्या सत्रात सेन्सेक्स ४१७.८0 अंकांनी घसरलाहोता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२.५0 अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी घसरून ७,२७६.८0 अंकांवर बंद झाला. निफ्टीची ही ३0 मे २0१४ नंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. सेन्सेक्समधील ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग घसरले.भारती एअरटेलचे समभाग मात्र वाढले. मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक ४.११ टक्क्यांनी घसरले. त्या खालोखाल डॉ. रेड्डीजचे समभाग घसरले. अन्य घसरणदारांमध्ये टाटा मोटर्स, कोल इंडिया, सन फार्मा, ओएनजीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, सिप्ला, आरआयएल, एलअँडटी, एमअँडएम आणि आयटीसी यांचा समावेश आहे. खाजगी बँक अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग वर चढला. विप्रो, एसबीआय, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, अदाणी स्पोर्ट्स, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी आणि भेल यांचे समभागही वाढले. (वृत्तसंस्था)क्षेत्रनिहाय पातळीवर वाहन क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली. त्या खालोखाल तेल व गॅस, आरोग्य सेवा, गतिमान ग्राहक वस्तू, धातू आणि सार्वजनिक उद्योग या क्षेत्रांत घसरण झाली. व्यापक बाजारातही घसरणीचाच कल दिसून आला. मीडकॅप निर्देशांक 0.३0 टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.५३ टक्क्यांनी घसरला.