नवी दिल्ली : विविध बँकांकडून व्याजदरांत कपात करण्यात येत असली तरी सरकारने अल्प बचतीवरील व्याजदर जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी ‘जैसे थे’ ठेवले आहेत. पीपीएफ खाती, तसेच टपाल कार्यालयांद्वारे चालविण्यात येणाऱ्या किसान विकास पत्रांसारख्या योजनांना त्याचा लाभ होईल. पाच वर्षांच्या परिपक्वतेच्या राष्ट्रीय बचत पत्रांनाही हा नियम लागू राहील. ११२ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या किसान विकास पत्रांवर वर्षाला ७.७ टक्के व्याज मिळेल.सुकन्या योजनेचा व्याजदर जैसे थेसुकन्या समृद्धी खाते योजनेवर ८.५ टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.५ टक्के, तसेच पाच वर्षांच्या आवर्ती ठेवींवर ७.३ टक्के व्याजदर कायम राहील. बचत खात्यांवर सध्या ४ टक्के व्याजदर मिळतो. एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर ७ ते ७.८ टक्के व्याज मिळते. ते कायम ठेवण्यात आले आहे.
अल्पबचतीचे व्याजदर ‘जैसे थे’
By admin | Updated: January 3, 2017 03:02 IST