Join us  

व्होडाफोन-आयडियाचा तोटा ५० हजार कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:09 AM

थकलेल्या वैधानिक देण्यांचा डोंगर वाढत गेल्याने व्होडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपनीचा ३० सप्टेंबर अखेरीस संपलेल्या या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील तोटा ५०,९२१ कोटी रुपयांवर पोहोचला.

नवी दिल्ली : थकलेल्या वैधानिक देण्यांचा डोंगर वाढत गेल्याने व्होडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपनीचा ३० सप्टेंबर अखेरीस संपलेल्या या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील तोटा ५०,९२१ कोटी रुपयांवर पोहोचला. अलिकडच्या काळात कोणत्याही भारतीय कंपनीने तिमाही ताळेबंदात जाहीर केलेला तोट्याचा हा सर्वोच्च आकडा आहे.अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅडजेस्टेड ग्रॉस रेव्ह्ेन्यूह्ण (एजीआर) प्रकरणी दिलेल्या निकालाचा बसलेला फटका हे या डोंगराएवढ्या तोट्याचे मुख्य कारण आहे. या निकालाच्या फेरविचारासाठी कंपनी याचिका करणार आहे. एक कंपनी म्हणून व्यवहार सुरू ठेवणे यापुढे सरकारकडून एजीआर प्रकरणी किती सवलत मिळते व फेरविचार याचिकेचा काय निकाल होतो यावरच अवलंबून असेल असे कंपनीने शेअर बाजारात कळविले आहे.गेल्या वर्षी दुसºया तिमाहीत या कंपनीचा तोटा ४,८७४ कोटी रुपये होता. यंदाच्या दुसºया तिमाहीत महसूल ४२ टक्क्यांनी वाढून ११,१४६ कोटी रुपयांवर पोहोचला पण त्याने तोटा कमी न होता उलट तो ५० हजार कोटी रुपयांहूनही अधिक झाला. याचे मुख्य कारण एजीआरचे द्यावे लागणारे देणे आहे. न्यायालयाच्या निकालानुसार कंपनीला थकित एजीआरपोटी तब्बल ४४,१५० कोटी रुपये चुकते करावे लागणार आहेत. त्यापैकी कंपनीने त्यांच्या खातेपुस्तकात यंदाच्या दुसºया तिमाहीसाठी २५,६८० कोटी रुपयांची तरतूद केली होती.

टॅग्स :व्होडाफोनआयडिया