Join us

बँकांचा तोटा ५०,००० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:59 IST

एनपीए प्रमाणही वाढले; मागील तिमाहीपेक्षा दुप्पटीहून अधिक वाढ

मुंबई : सरकारी बँकांच्या तोट्यात २०१७-१८ या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत दुप्पटीहून अधिक वाढ झाली. वार्षिक निकाल घोषित केलेल्या १५ पैकी १३ बँकांना अखेरच्या तिमाहीत एकूण ५० हजार कोटींचा तोटा झाला. हा तोटा मागील तिमाहीत १९ हजार कोटी रुपये होता.नीरव मोदीसारखे घोटाळे व बुडित कर्जांपोटी करावी लागणारी तरतूद यामुळे बँकांचा तोटा उच्चांकावर गेला आहे. १५ सरकारी बँकांपैकी फक्त विजया बँक व इंडियन बँकेने नफा नोंदवला आहे. बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज, युनायटेड व आयडीबीआय या संकटातील बँकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बँकांच्या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.तज्ज्ञांनुसार, सरकारी बँकांमधील बुडित कर्जांचे प्रमाण डिसेंबर २०१७ पर्यंत ११ ते १२ टक्क्यांदरम्यान स्थिर होते. पण २०१७-१८ च्या अखेरच्या तिमाहीत त्यात वाढ होऊन ते १३.४१ टक्के झाले. व्यावसायिक कर्जांच्या पुनर्गंठनावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने एनपीए वाढला आहे.सरकारी बँकांना केंद्र सरकारने २०१७-१८ या वर्षात ६५ हजार कोटींची भांडवली मदत दिली. पण बँकांचा तोटा पाहता ही मदत पुरेशी ठरलेली नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या बँकांनाच मदत केली जाईल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. पण बुडित व थकित कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तोट्यातील बँकांना मदतीची गरज अधिक आहे. यामुळे केंद्राची मदत मिळणार अथवा नाही, याबाबत बँकिंग क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे.कर्मचाऱ्यांनो स्वत: तक्रार कराघोटाळे हे बँकांच्या तोट्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे कर्मचाºयांनीच दक्ष राहून असे घोटाळे होत असल्यास स्वत: व्यवस्थापनाकडे तक्रार करावी, अशी सूचना युनियनकडून कर्मचाºयांना देण्यात आली आहे. आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज युनियनने (एआयबीईए) तसे पत्रक काढले आहे. बँक आॅफ महाराष्टÑमध्ये यासंबंधीचे तक्रार पोर्टल असून त्यावर कर्मचाºयांनी तक्रार करावी, असे आवाहन युनियनने केले आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र