Join us

बुलढाण्यात भगवान परशुरामांचा जयघोष, जन्मोत्सवानिमित्त दुचाकी रॅली

By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 22, 2023 16:24 IST

भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर येथील पेठेतील श्रीराम मंदिरापासून शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. 

बुलढाणा : भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त बुलढाणा शहरातुन २२ एप्रिल रोजी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी भगवान परशुरामांच्या जयघोषाने शहर परिसर दुमदुमून गेला होता.बुलढाणा शहरात भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर येथील पेठेतील श्रीराम मंदिरापासून शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. 

शहरातील मुख्य चौकांसह विविध मार्गाने ही रॅली गेली. त्यानंतर येथील चैतन्यवाडी परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जय परशुरामच्या निनादाने परिसर दुमदुमला होता. भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या पर्वावर बुलढाणा शहरातील दुचाकी रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. जय परशुरामांचा जयघोष करीत, भगवे दुपट्टे परिधान केलेल्या महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला होता. 

टॅग्स :बुलडाणा