नवी दिल्ली : रिअल्टी (घरबांधणी, जमीनजुमल्याचे व्यवहार आदी) क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित होण्यासाठी सरकारने नव्या उदार धोरणांची अधिसूचना बुधवारी जारी केली. या नियमांनुसार थेट विदेशी गुंतवणुकीसाठीचे किमान निर्मिती क्षेत्र घटविण्यात आले असून थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादाही कमी करण्यात आली आहे. भारतात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीसाठी परवानगी आहे.या नियमांनुसार किमान विदेशी गुंतवणुकीची मर्यादाही कमी करण्यात आली असून प्रकल्पातून बाहेर पडण्याचे नियमही सोपे बनविण्यात आले आहेत. उत्पादन विकास क्षेत्राशी संबंधित सुधारित नियमांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आधीच मिळाली आहे.याचबरोबर किमान विदेशी गुंतवणूक एक कोटी डॉलरवरून घटवून ती ५० लाख डॉलर करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रिअल्टी क्षेत्रासाठी नियम शिथिल!
By admin | Updated: December 4, 2014 00:39 IST