Join us

लोकमतच्या पुढाकारास यश-२

By admin | Updated: August 1, 2015 00:19 IST


बॉक्स..
आश्वासून पूर्ण केले - मुनगंटीवार
व्यापाऱ्यांना एलबीटीपासून मुक्ती देण्यात मुख्य भूमिका निभावणारे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा लोकमतच्या अभियानाचे स्वागत केले. मुनगंटीवार म्हणाले, १ ऑगस्टपासून एलबीटी हटविण्याचे आश्वासन राज्यातील व्यापाऱ्यांना आणि लोकमतला दिले होते. शासनाने आपले आश्वान पूर्ण केले आहे. या निर्णयामुळे मनपाचे उत्पन्न कायम ठेवणे ही राज्य शासनापुढे सर्वात मोठी अडचण होती. अशा परिस्थितीत शासनाने मनपाला देण्यात येणाऱ्या निधीत ८ टक्के वाढ केली आहे. दुसरी मुख्य अडचण म्हणजे व्यापाऱ्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याची होती. ती दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या इच्छेचा सन्मान करण्यात आला आहे. आता केवळ एक हजार व्यापाऱ्यांनाच एलबीटी द्यावा लागणार आहे. सात कोटी व्यापारी यातून मुक्त झाले आहेत.