Join us  

Lockdown : अंशत: लॉकडाऊनचा कामगार, वस्तूंच्या वितरणावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:35 AM

Lockdown : कामगार व वस्तूंच्या हालचालींवर मर्यादा  आल्यास औद्योगिक उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. 

नवी दिल्ली : अंशत: लॉकडाऊनचा कामगारांचे स्थलांतर आणि वस्तूंच्या वितरणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) केलेल्या सीईओंच्या एका सर्वेक्षणात देण्यात आला आहे. कामगार व वस्तूंच्या हालचालींवर मर्यादा  आल्यास औद्योगिक उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश सीईओंनी सूचित केले की, अंशत: लॉकडाऊन उपायांचा कामगारांच्या स्थलांतरावर आणि मालाची वाहतूक यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्यापेक्षा जास्त सीईओंनी सांगितले की, अंशत: लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हालचालींवर मर्यादा आल्यास आपल्या उत्पादनावर परिणाम होईल. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या