Join us  

Life Insurance : विमा कंपन्यांची 'UPI' सिस्टीम येणार, IRDAI ने दिली मंजुरी, खरेदी अन् क्लेम ऑनलाईन करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 10:48 AM

Life Insurance : इन्शुरन्स सेक्टरमध्ये लवकरच युपीआय सिस्टीम येणार आहे, त्यामुळे ग्राहकांना आता ऑनलाईन खरेदी करता येणार आहे आणि क्लेमही करता येणार आहे.

Life Insurance :  इन्शुरन्स सेक्टरमध्ये लवकरच युपीआय सिस्टीम येणार आहे, त्यामुळे ग्राहकांना आता ऑनलाईन खरेदी करता येणार आहे आणि क्लेमही करता येणार आहे. यामुळे आता विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना विमा कंपनीच्या वेबसाईटवर किंवा एजंटकडे जायची गरज नाही, आता विमा नियामक IRDAI ने ONDC ला इलेक्ट्रॉनिक मार्केटप्लेस सुरू करण्यास मान्यता दिली आहे. बिमा सुगम ही एक विमा पायाभूत सुविधा असेल तिथे सर्व विमा कंपन्यांची माहिती उपलब्ध असणार आहे, या सुविधेमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; भावात घसरण सुरूच

या मार्केटवर विमा कंपन्यांचा हक्क असू शकतो. बिमा सुगम कंपन्या, उत्पादने आणि वितरकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच, ग्राहकाला विमा खाते क्रमांक देखील दिला जाईल. त्या खाते क्रमांकाद्वारे ग्राहक एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाऊ शकतील.

या सुविधा मिळतील

बिमा सुगम प्लॅटफॉर्मवर विमा खरेदी-विक्री सोबतच, तुम्ही येथून क्लेमही करु शकता. ऑनलाइन वितरक देखील या प्लॅटफॉर्मचा एक भाग असू शकतात. IRDAI ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हे मार्केटप्लेस विमा क्षेत्रातील सर्व भागधारकांसाठी असेल. ग्राहक, विमाधारक, एजंट एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. यामुळे संपूर्ण यंत्रणेत पारदर्शकता येईल.

टॅग्स :व्यवसाय