Join us  

LIC च्या शेअरला तेजी! १० दिवसांपासूनची पडझड थांबली, गुंतवणूकदारांनी घेतला मोकळा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 9:32 AM

LIC Share: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअरची पडझड अखेर थांबली आहे. गेल्या १० दिवसांपासूनची एलआयसीच्या शेअरची घसरण थांबल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोकळा श्वास घेतला आहे. 

LIC Share: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअरची पडझड अखेर थांबली आहे. गेल्या १० दिवसांपासूनची एलआयसीच्या शेअरची घसरण थांबल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोकळा श्वास घेतला आहे. 

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एसआयसीच्या शेअरची मंगळवारी सकाळी सकारात्मक सुरुवात झाली आणि दोन टक्क्यांच्या वाढीसह शेअर ६८४ रुपयांवर पोहोचला. सोमवारी अँकर गुंतवणूकदारांसाठीचा ३० दिवसांचा लॉक-इन कालावधी संपुष्टात आल्यानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. 

एलआयसीचा शेअर मंगळवारी ६७५.८० रुपयांवर बंद झाला. तर सोमवारी चक्क ६ टक्क्यांहून अधिक घसरणीसह शेअरची किंमत ६६८.२५ रुपयांवर पोहोचली होती. 

मार्केट कॅपिटलमध्ये मोठी घसरणएलआयसीचा शेअर आतापर्यंत इशू प्राइजच्या तुलनेत जवळपास २८ टक्क्यांनी पडला आहे. एलआयसीच्या शेअरची इशू प्राइज ९४९ रुपये इतकी होती. एलआसीच्या वाईट कामगिरीमुळे मार्केट कॅपिटलमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली होती. एलआयसीचा एकूण मार्केट कॅप मंगळवारी जवळपास १.७३ कोटी रुपयांवरुन खाली आला. आयपीओच्या वेळी याची किंमत ६ लाख कोटी रुपये इतकी होती. 

सरकार चिंतेतDIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसीच्या शेअर मधील पडझडीमुळे सरकार चिंतेत आहे. एलआयसीचं व्यवस्थापन देखील या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार असून शेअरचं मूल्य कसं वाढवता येईल यावर काम करत आहे. एलआयसीच्या आयपीओची लिस्टिंग १७ मे रोजी झाली होती. 

१.७ लाख कोटी स्वाहाएलआयसीच्या शेअरमध्ये पडझ झाल्यानंतर पॉलिसीधारक आणि रिटेलर्सला देखील खूप मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. लिस्टिंगवेळी गुंतवणूकदारांना इशू प्राइसवर ६० रुपये आणि ४५ रुपयांची सूट मिळाली होती. पण सातत्यानं शेअरमध्ये घसरण होत असल्यानं आतापर्यंत गुंतवणूकदारांचे १.७ लाख कोटींहून अधिक रक्कम स्वाहा झाली आहे. एक वेळ अशी आली होती की एलआयसीचा शेअर ६६३.९५ इतक्या खाली उतरला होता.  

टॅग्स :एलआयसी आयपीओएलआयसी