Join us  

‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 7:04 AM

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे.

नवी दिल्ली :

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे. ही योजना वैयक्तिक व बचत जीवन विमा या श्रेणीतील आहे. यात विम्यासोबतच बचतीचा उद्देशही साध्य होतो.

या योजनेत हमीपूर्ण उत्पन्न लाभ मिळतो. ही योजना किमान ५ वर्षे व कमाल १५ वर्षे मुदतीची आहे. लाभाचे अनेक पर्याय योजनेत उपलब्ध आहेत. जोखीम कालावधी सुरू झाल्यानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास वित्तीय साह्य मिळेल. मृत्यूपश्चात लाभ एकरकमी किंवा हप्त्या-हप्त्याने मिळू शकतात. (वा.प्र)

टॅग्स :एलआयसी