धामणी मध्यम प्रकल्पासाठी निधी द्या चंद्रदीप नरकेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
कोपार्डे : राधानगरी तालुक्यातील धामणी खोर्यातील ५० ते ६० गावांच्या जीवनाचा प्रश्न असणार्या धामणी प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
धामणी मध्यम प्रकल्पासाठी निधी द्या चंद्रदीप नरकेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
कोपार्डे : राधानगरी तालुक्यातील धामणी खोर्यातील ५० ते ६० गावांच्या जीवनाचा प्रश्न असणार्या धामणी प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.निवेदनात या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम १९९६ मध्ये सुरू झाले असून, त्यावेळी त्याला १२० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर हे काम रखडले असताना २००५ मध्ये ३२० कोटी रुपये किमतीला प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या मध्यम प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २००० मध्ये सुरू झाले. तथापि, या प्रकल्पामध्ये १४० हेक्टर वनक्षेत्र बाधित होत असल्याने वनक्षेत्रास केंद्रशासनाची मान्यता घण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब झाल्याने प्रकल्प रखडला आहे. परिणामी, प्रकल्पाची किंमत वाढलेली आहे. या प्रकल्पामध्ये ३.८५ टी. एम. सी पाणीसाठा होणार असून, धामणी खोर्यातील गावांच्या शेतकर्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.मात्र, सध्या धरणाचे काम ७५ टक्के पूर्णत्वास गेले आहे. आतापर्यंत या मध्यम प्रकल्पावर २९५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पूर्णक्षमतेने पाणीसाठा करण्यासाठी सदर प्रकल्पाचे काम मार्गी लावणे गरजेचे असून, त्या अनुषंगाने या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.