Join us

ज्वेलरांची खरेदीकडे पाठ; सोने-चांदी पुन्हा घसरले

By admin | Updated: December 12, 2015 00:02 IST

जागतिक बाजारातील कमजोर कलाच्या पार्श्वभूमीवर ज्वेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी सराफा बाजारात घसरण झाली.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर कलाच्या पार्श्वभूमीवर ज्वेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी सराफा बाजारात घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोने सलग दुसऱ्या दिवशी ९0 रुपयांनी घसरून २५,७१0 रुपये तोळा झाले. चांदीही २५0 रुपयांनी घसरून ३४,0५0 रुपये किलो झाली. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाणार असल्याच्या वृत्तामुळे बाजारात घसरण होत आहे. ज्वेलरांनी खरेदी कमी केल्याचा फटका सोन्याला बसला. औद्योगिक क्षेत्राकडून असलेली मागणी घटल्यामुळे चांदीच्या भावात घसरण झाली. जागतिक बाजारापैकी सिंगापूर येथे सोने 0.५ टक्के घसरून १,0६५.९७ डॉलर प्रति औंस झाले. लंडनच्या बाजारात सोने 0.२७ टक्क्यांनी घसरून १,0६८.६0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ९0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २५,७१0 रुपये आणि २५,५६0 रुपये तोळा झाले. काल सोने ४0 रुपयांनी उतरलेहोते.