Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिगो’कडून लीप इंजिनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 04:37 IST

सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे निर्णय; तांत्रिक कारणास्तव ११ विमानांचा वापर बंद

मुंबई : सातत्याने तांत्रिक बिघाड होणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनी या इंजिनाऐवजी सीएफएम लीप इंजिनाला प्राधान्य देण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. इंडिगोने याबाबत सीएफएम इंटरनॅशनलला एलईएपी १ ए प्रकारच्या इंजिनसाठी २० बिलियन डॉलर्स किमतीची आॅर्डर दिली आहे.यामध्ये एअरबस ए ३२० निओ व ए ३२१ निओ विमानांसाठी लागणारी २८० इंजिने घेण्यात येणार आहेत. याचा पहिला ताफा २०२० मध्ये कंपनीत समाविष्ट होईल. या करारामध्ये स्पेअर इंजिन व ओव्हरहॉल साहाय्य याचा समावेश करण्यात आला आहे. प्रॅट अँड व्हिटनीमधील सततच्या बिघाडामुळे इंडिगोला अनेक विमाने ग्राउंडवर पार्क करून ठेवावी लागली व त्याची दुरुस्ती करावी लागली. त्यामुळे कंपनीची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्याचा मोठा फटका कंपनीला बसला होता. मार्च, २०१८ मध्ये ११ विमानांचा वापर बिघाडामुळे बंद करण्यात आला होता. हवेत विमाने असताना हे बिघाड झाल्याने काही प्रसंगी इर्मजन्सी लँडिंग करावे लागले होते. भविष्यात आॅपरेशनल खर्च कमी करण्यावर व इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी कमी इंधन वापर करणाºया इंजिनाचा वापर करण्यास कंपनीने प्राधान्य दिल्याची माहिती देण्यात आली. सध्या कंपनीच्या ताफ्यात २३० विमानांचा समावेश असून, ५४ देशांतर्गत व १९ आंतरराष्ट्रीय ठिकाणी दररोज १,४०० उड्डाणे केली जातात.

टॅग्स :इंडिगो