Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोर परिसरातील तो प˜ेदार वाघ बेपत्ता

By admin | Updated: May 8, 2014 20:53 IST

बोर परिसरातील तो प˜ेदार वाघ बेपत्ता

बोर परिसरातील तो प˜ेदार वाघ बेपत्ता
हत्येचा संशय : बोर अभयारण्यातील अधिकारी अनभिज्ञ

प्रफुल्ल लुंगे - सेलू(जि.वर्धा)
बोरधरणाच्या भिंतीच्या शेवटच्या टोकाजवळ राममंदिराला लागून असलेल्या नदीपात्रात नित्यनेमाने पाणी पिण्यासाठी एक प˜ेदार वाघ येत होता. ऐन उन्हाळ्यातच पर्यटकांना दिसेनासा झाल्याने त्या वाघाच्या हत्येचा संशय पर्यटकांसह परिसरातील लोकांना आहे. याबाबत वनविभाग आणि बोर अभयारण्य व्यवस्थापन अनभिज्ञ आहे.
राममंदिराजवळून हा वाघ पाणी पिऊन दररोज जंगलात जायचा. संध्याकाळी ६.३० ते ७ वाजताच्या दरम्यान परत जाताना त्या परिसरातील लोक त्याला आवर्जून बघत होते. पर्यटकही या वाघाला डोळ्यात साठवून जात होते. अर्धा उन्हाळा संपत आला तरी हा वाघ कुणालाच दिसला नाही. ६ मे रोजी जंगल भ्रमंती करताना एका महिला पर्यटकाला भुलाई डोहाजवळ एका प˜ेदार वाघाचे दर्शन झाले. तिने त्याचे छायाचित्र टिपले. हाच तो वाघ असावा असे प्रथमदर्शिनी वाटले मात्र हा तो वाघ नव्हे असा दुजोरा दिला. मग तो नेहमी दिसणारा वाघ कुठे गेला, असा प्रश्न परिसरातील नागरिकांसह पर्यटकांना पडला आहे.
तो वाघ वयस्क होता. त्याची शिकार करण्यात आली असावी किंवा परिसरातील शेतकर्‍यांनी लावलेल्या शेतातील तारेच्या कंुपनात सोडलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असे अंदाज बांधले जात आहे. वृद्धापकाळाने वाघाचा मृत्यू झाला असता तर त्याचा मृतदेह तरी आढळला असता, असेही बोलले जात आहे. वनरक्षक डी.टी. चौधरी यांनी सांगितले, की राममंदिराजवळ नित्यनेमाने येणारा वाघ अलीकडे दिसत नाही. त्याचा शोध सुरू आहे.