Join us  

१० हजार रुपयांत ब्रँडेड ५जी स्मार्टफोन; दिवाळी खरेदीपूर्वी जाणून घ्या फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 4:15 PM

Lava Blaze2 असं या स्मार्टफोनच्या मॉडेलचं नाव असून १० हजार रुपयांच्या किंमतीत ग्राहकांना हा ५ जी मोबाईल खरेदी करता येणार आहे.

दिवाळी सण अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, ग्राहकांकडून दिवाळीनिमित्त स्पेशल खरेदी करण्यात येत असून बाजारात गर्दी होत आहे. विविध कंपन्यांकडून ब्रँडेड वस्तूंवरही भन्नाट स्कीम देऊन ग्राहकांना आकर्षिक केलं जात आहे. अलिकडच्या काळात दसरा-दिवाळी सणाला मोबाईलची सर्वाधिक विक्री होते, त्यामुळे, मोबाईल कंपन्यांमध्येही कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्सचा स्मार्टफोन देण्याची स्पर्धा दिसून येते. आता, ५ जीची चलती असल्याने ५ जी फोन्सही कमी किंमतीत बाजारात उपलब्ध झाले आहेत. LAVA कंपनीनेही कमी किंमतीतील ५ जी स्मार्टफोन लाँच केला आहे. 

Lava Blaze2 असं या स्मार्टफोनच्या मॉडेलचं नाव असून १० हजार रुपयांच्या किंमतीत ग्राहकांना हा ५ जी मोबाईल खरेदी करता येणार आहे. यासह फोनमध्ये अनेक आकर्षक फिचर्स आहेत. हा हँडसेट रिंग लाईटवाल्या कॅमेरा मॉड्युलसह येतो. या लाईटला तुम्ही तुमच्या गरजेनुसार सेट करू शकता. यात अँड्रॉईड १३ आणि इतरही फिचर्स मिळणार आहेत.

Lava Blaze 2 ५जी ची किंमत 

लावा चा हा फोन दोन कॉन्फिग्रेशन मध्ये उपलब्ध आहे. कंपनी ने हा स्मार्टफोन ग्लास ब्लॅक, ग्लास ब्लू आणि ग्लास लवेंडर कलरमध्ये लाँच केलं आहे. याचे बेस व्हेरिएंट म्हणजे  4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. तर, 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. 

हा स्मार्टफोन तुम्हाला Amazon.in किंवा लावा इंडिया च्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करता येईल. 9 नोव्हेंबरपासून ह्या स्मार्टफोनचा सेल सुरू होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून सर्व्हीस होम डिलिव्हरी ऑफर देण्यात येत आहे. म्हणजे, मोबाईलमध्ये काहीही तांत्रिक अडचण असल्यास कंपनीतर्फे तुम्हाला घरी येऊन सर्व्हीस मिळेल. 

स्पेसिफिकेशन्स काय आहेत.  

Lava Blaze 2 5G स्मार्टफोन साठी 6.56-inch चा HD+ LCD डिस्प्ले आहे. जो 2.5D कर्व्ड स्क्रीन आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. त्यामध्ये, ऑक्टाकोर MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिवाइसमध्ये 4GB RAM आणि 6GB RAM चाही पर्याय आहे. फोनमध्ये 50MP मेन लेंसवाला डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर, फ्रंट कॅमेरा 8 मेगा पिक्सेलचा आहे. 

टॅग्स :लावास्मार्टफोन५जी