Join us

दोषींवर कारवाइसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू लोहारा येथील पाणीटंचाईच्या कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

लोहारा: पाणीटंचाईच्या काळात स्वत:चे अधिकार वापरत सरपंच व सचिवाने ग्रा.पं.चा कुठलाही ठराव न घेता एका बोअरमधून १३ लाख खर्चून पाइपलाइन टाकून पाणी आणले होते. या कामाच्या चौकशीमध्ये लोहरा ग्रामपंचायत सरपंच व सचिवाने संगनमत करून शासनाच्या पैशाच्या अपव्ययासह अनियमितता केल्याचे उघडकीस आलेले आहे; मात्र दोषींवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंमतराव तायडे, रवींद्र काशीराम मोरे व शुभम भागवत मोरे यांनी २३ जानेवारीपासून ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.

उपमुख्याधिकारी पंचायत अकोला यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोहारा, ता. बाळापूर या गावाचे सरपंच फातेमाबी अ. लतीफ देशमुख आणि सचिव शशी इंगळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये घेतलेले ठराव बाजूला सारून स्वत:च्या मर्जीने पाइपलाइन टाकण्याचे काम केले. यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आपण केली होती. त्यानुसार चौकशी समिती नेण्यात आली आणि या चौकशी समितीने १८ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या तक्रारीच्या चौकशी अहवालात सरपंच व सचिव यांनी १४ व्या वित्त आयोगातून तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेल्या कामाव्यतिरिक्त कामे केली. शिवाय कामामध्ये मूल्यांकनापेक्षा ८,८६४ रुपयांचा खर्च जास्त केलेला आहे, असा ठपका ठेवला होता. सदर कामांची मुख्य कार्यपालन अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही परवानगी न घेता कामे केली. या बाबीस सरपंच आणि सचिव हे जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र अद्यापपर्यंत दोषींवर करवाई झालेली नाही. अहवालानुसार सरपंच आणि सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी तक्रारकर्ते तायडे यांनी केली आहे. तत्काळ करवाई व्हावी अन्यथा २३ जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला होता. त्यानुसार कुठलीही कारवाई न करण्यात आल्याने ग्रामस्थांनी २३ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (वार्ताहर)
फोटो आहे