Join us

सहा महिन्यांत १ लाख नोक-या

By admin | Updated: January 26, 2015 03:55 IST

भारतातील ई-कॉमर्सचे क्षेत्र आता १२ अब्ज डॉलरचे झाले असून येत्या ६ महिन्यांत या क्षेत्रात तब्बल १ लाख नव्या नोक-या निर्माण होतील. या क्षेत्राशी संबंधित जाणकारांनी ही माहिती दिली.

मुंबई : भारतातील ई-कॉमर्सचे क्षेत्र आता १२ अब्ज डॉलरचे झाले असून येत्या ६ महिन्यांत या क्षेत्रात तब्बल १ लाख नव्या नोक-या निर्माण होतील. या क्षेत्राशी संबंधित जाणकारांनी ही माहिती दिली.रोजगाराच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी कंपनी ‘इनहेल्म लीडरशिप सोल्युशन्स’च्या वतीने ही माहिती जारी करण्यात आली. कंपनीचे भारतातील प्रमुख प्रशांत नायर यांनी सांगितले की, नियुक्त्यांसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या कंपन्यांना सध्या ई-कॉमर्स क्षेत्रातील रोजगारांच्या संधीत वाढ असल्याचे दिसून येत आहे. आगामी सहा महिन्यांत या क्षेत्रात १ लाख नोकऱ्या उपलब्ध होतील, असे दिसते. भारताचा ई-कॉमर्स बाजार झपाट्याने वाढत आहे. २00९ साली तो ३.८ अब्ज डॉलरचा होता. २0१३ मध्ये तो वाढून १२.९ टक्के झाला. या क्षेत्राचा वाढीचा वार्षिक दर तब्बल ३0 टक्के आहे. जागतिक पातळीवर या क्षेत्राचा वाढीचा दर ८ टक्के आहे. भारतात मात्र तो त्यापेक्षा चार पटीने जास्त प्रमाणात वाढत आहे. नायर यांनी सांगितले की, ई-कॉमर्स क्षेत्रासमोरील सर्वांत महत्त्वाचे आव्हान लोकांना नोकरीत टिकवून ठेवण्याचे आहे. वेतनाला या क्षेत्रातही महत्त्व आहे. तथापि, या क्षेत्रातील कर्मचारी त्यापेक्षाही पुढचे पाहतात. या क्षेत्रात सशक्तीकरण, कार्य संस्कृती आणि नवीनता यावर अधिक लक्ष दिले जाते. इॅ-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना ईशान्य भारतात सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर वस्तू थेट घरी येत असल्यामुळे खरेदी सोपी झाली आहे. कंपन्यांकडून ग्राहकांच्या हिताची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे लोक आॅनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहेत.