Join us

बुकिंगचा आज अखेरचा दिवस

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST


वाणिज्य बातमी .. १० बाय ३ ...

फोटो आहे.. एच/डेली/कस्तुरी...
कॅप्शन : हार्मोनी रेसिडेन्सी आणि कस्तुरी नगरी या निवासी प्रकल्पांचे संकल्प चित्र.

- हार्मोनी रेसिडेन्सी व कस्तुरीनगर योजना : आधुनिक सोयीसुविधा

नागपूर : हार्मोनी रेसिडेन्सी व कस्तुरीनगर या निवासी योजनेत घर नोंदणीसाठी सुरू असलेला आठ दिवसीय मेगा उत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार, ५ ऑक्टोबर अखेरचा दिवस आहे.
बुकिंग उत्सव रुक्मिणी लॉन, भिडे कॉम्प्लेक्स, मानेवाडा चौक येथे सुरू आहे. फारच कमी रुपये भरून नोंदणी करता येईल. बेसा येथील हामार्ेनी रेसिडेन्सीमध्ये २ बीएचकेचे ४८ युनिट आणि तीन बीएचकेचे चार डुप्लेक्स आहेत. तसेच पांजरी येथील कस्तुरीनगर येथे ३०० पेक्षा जास्त फ्लॅटची टाऊनशिप आहे. या योजनेत काहीच फ्लॅट शिल्लक आहेत. नवरात्रीत घर खरेदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच बुकिंग उत्सवाचे आयोजन केले आहे. घराची नोंदणी करून कंपनीच्या विशेष योजनांचा लाभ घेण्याची संधी आहे. दोन्ही प्रकल्प नासुप्रतर्फे मंजूर आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणे केव्हाही फायद्याचे ठरणार आहे.
वेगाने विकसित होणाऱ्या बेसा भागात अनेकांनी घरांची खरेदी केली आहे. ही योजना मिहान प्रकल्पालगत आहे. याशिवाय सुलभ वाहतूक व्यवस्था, नामांकित शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल आहेत. २४ तास सुरक्षा व्यवस्था राहील. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पर्यावरणाला पूरक योजना आहे. लहानांसाठी खेळण्याची जागा, इंडोअर खेळांची सोय, विस्तीर्ण पार्किंग, पॉवर बॅकअपसह लिफ्ट आहे. शिवाय तीन एकरातील कस्तुरीनगर योजना मानेवाडा आणि मनीषनगराजवळ आहे. कमी दरात गुणवत्तेचे बांधकाम मिळणार आहे. फायनान्सची सोय आहे. स्काय डेव्हलपर्स, राज ॲण्ड राज कन्स्ट्रक्शन, फक्री इन्फ्राव्हेंचर यांच्या संयुक्त योजना आहेत. आदी ऊर्वी इन्फ्रा सर्व्हिसेस प्रा.लि. मार्केटिंग करीत आहे.