Join us  

टमाट्याच्या दरामध्ये मोठी वाढ; उत्पादन कमी असल्याने दर पोहोचले ५० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 6:49 AM

गेल्या आठवड्यापर्यंत २० ते २५ रुपये किलो दराने मिळणाºया टमाट्याचे दर एका सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून, ते आता ५० रुपयांच्या आसपास आहेत.

मुंबई : आपल्या रोजच्या जेवणाला चव देणाऱ्या टमाट्याच्या दरामध्ये गेल्या सप्ताहापासून अचानक वाढ झाली असून, काही ठिकाणी हे दर किलोला ७० रुपयांपर्यंत गेले आहेत. कमी प्रमाणात होत असलेले उत्पादन आणि पावसामुळे टमाटा पिकाचे झालेले नुकसान यामुळे बाजारातील आवक घटल्याने ही दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येते.गेल्या आठवड्यापर्यंत २० ते २५ रुपये किलो दराने मिळणाºया टमाट्याचे दर एका सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून, ते आता ५० रुपयांच्या आसपास आहेत. नाशिक जिल्ह्यासारख्या टमाट्याचे मोठे उत्पादन होणाºया ठिकाणीही दर ३५ ते ४० रुपये किलोवर पोहोचले आहेत.या काळामध्ये टमाट्याचे उत्पादन तसेही कमीच असते. मात्र मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे या पिकाचे नुकसान झाल्याने बाजारामध्ये होणारी आवक घटली असल्यामुळे ही दरवाढ होत असल्याचे नाशिकमधील उत्पादक व व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत २० रुपये किलोपर्यंत असलेले दर आता ४० रुपयांवर पोहोचले आहेत. नगरमध्ये दर ५० रुपये आहेत.मुंबईत ४० ते ५० रुपये, रत्नागिरी येथे सध्या ८० रुपये किलोचा दर आहे, तर कोल्हापूरमध्ये दर २५ ते ३० रुपये प्रतिकिलो असे आहेत.सांगलीत ३० ते ४० रुपये, सोलापूर ५० ते ७० रुपये, तर नागपूरमध्ये ६० ते ७० रुपये असे दर आहेत.तज्ज्ञांना पाचारणदेशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सध्या टमाट्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कमी असलेले उत्पादन आणि घटलेली आवक यामुळे हे दर वाढले असल्याचे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. गुडगाव, गंगटोक, सिलिगुडी आदी शहरांमध्ये दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो झाल्याचे त्यांनी सांगितले. हैदराबादसह टमाट्याचे उत्पादन होणाºया विविध भागामध्येही दर वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, केरळ, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये टमाट्याचे उत्पादन कमी होत असते.

टॅग्स :व्यवसाय