Join us
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे वाटप रद्द बातमीचा जोड

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

इन्फो बॉक्स

इन्फो बॉक्स
दोन कोटींची रक्कम होणार शासनजमा
मे. ॲपेक्स रिअल इस्टेट लिमिटेडला जमिनीचे वाटप मंजूर करण्यात आल्यानंतर कंपनीने इसारा रक्कम म्हणून दोन कोटी रुपये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा केले होते. अटी व शर्तीनुसार निर्धारित मुदतीत उद्योग सुरू करण्यात आला नसल्यामुळे कंपनीला देण्यात आलेल्या जमिनीचे वाटप महामंडळाने रद्द केले आहे. त्यामुळे कंपनीने भरलेली दोन कोटी रुपयांची इसाराची रक्कम शासनजमा करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळांच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोट
मे.ॲपेक्स कंपनीचे जमीन वाटप रद्द करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आता मूर्तिजापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात नवीन ले-आउट करून उद्योजकांना भूखंडांचे वाटप करण्यात येईल.
सुनील विंचनकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, अमरावती.
००००००००००००००००००००००००००००