Join us  

Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 2:27 PM

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Investment : कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसध्या व्होडाफोन-आयडिया ही कंपनी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.

सध्या व्होडाफोनआयडिया (Vodafone-Idea) ही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारच्या निर्णयामुळे कंपनीला दिलासा मिळाला असला तरी कंपनीसमोरील आव्हानं मात्र संपलेली नाहीत. व्होडाफोनआयडियाचं बाजारातील अस्थित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये अधिक पैसा गुंतवण्याची गरज आहे. दरम्यान, कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीतील आपला विश्वास वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा भरवसा वाढवण्यासाठी टोकन गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. 

मनीकंट्रोलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुमार बिर्ला कंपनीमध्ये १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करू शकता. व्होडाफोन आयडियाला सरकारच्या निर्णयानंतर मिळालेल्या दिलास्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत प्रमोटर बिर्ला यांच्याकडून गुंतवणूक झाल्यावर अन्य गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास वाढेल आणि ते संकटाचा सामना करणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी पुढे येऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मनीकंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये प्रमोटर व्होडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने १० हजार कोटी रुपये इतकी मोठी रक्कम गुंतवण्यासाठी सरकार आणि Vodafone-Idea (Vi) यांच्यात कोणताही करार झालेला नाही. यापूर्वी बिर्ला यांनी व्होडाफोन आयडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु दूरसंचार क्षेत्रासाठी मदतीसाठी सरकारचं मन वळवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोकन गुंतवणूक बिर्ला समूहाच्या कोणत्या लिस्टेड कंपनीद्वारे होऊ शकते. परंतु कुमार मंगलम बिर्ला ही गुंतवणूक आपलं स्वामित्व असलेल्या कोणत्याही कंपनीद्वारे वैयक्तीक स्वरूपात करू शकतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :व्होडाफोनआयडियाकुमार मंगलम बिर्ला