Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कल्ले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST

भिमाभाऊ सांगवीकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार

भिमाभाऊ सांगवीकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार
मुंबई : शेकडो हिंदी व मराठी चित्रपट गीतांना आपल्या सुमधूर आवाजाने लोकप्रियता प्राप्त करून देणार्‍या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा 2013-14 या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ तमाशा कलावंत भिमाभाऊ सांगवीकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व र्शीफळ असे आहे.
कृष्णा कल्ले यांनी 1960 पासून आकाशवाणीवर गायिका म्हणून काम केले. 200 हिंदी तर 100 मराठी चित्रपट गीतांना त्यांनी आवाज दिला. याखेरीज भक्तीगीते, गजला त्यांनी गायल्या आहेत. यापूर्वी त्यांना तत्कालीन पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते युथ फेस्टीव्हल पुरस्कार तर तत्कालीन राष्ट्रपती स्व. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक, सेहगल मेमोरियलतर्फे देण्यात येणारा गोल्डन व्हॉईस पुरस्कार, पी. सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा गंगा जमुना पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
सांगवीकर यांनी भिका भिमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या माध्यमातून लोककलेचा वारसा पुढे नेला. गेली 42 वर्षे त्यांनी लोककलेला पुढे नेण्याचे कार्य केले. शाळा आणि देवस्थानांच्या मदतीकरिता त्यांनी सामाजिक बांधिलकीतून कार्यक्रम केले.
यापूर्वी माणिक वर्मा, र्शीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, रवींद्र जैन, सुमन कल्याणपूर, जयमाला शिलेदार, सुलोचना चव्हाण, अशोक पत्की आदींना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले आहे तर विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बडे, मंगल बनसोडे, साधूरामा पाटसुते, अंकुश संभाजी खाडे तथा बाळू, प्रभा शिवणेकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)