Join us  

कोकणचा हापूस थेट घरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:31 AM

आता ग्राहकांना कोकणचा हापूस आंबा थेट उत्पादकांकडून आपल्या घरी मागवता येणार आहे. उत्पादक-ग्राहक यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करणाऱ्या टाटा-टेस्कोच्या ‘स्टार’ या उपक्रमामुळे आता हे शक्य होणार आहे.

मुंबई : आता ग्राहकांना कोकणचा हापूस आंबा थेट उत्पादकांकडून आपल्या घरी मागवता येणार आहे. उत्पादक-ग्राहक यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करणाऱ्या टाटा-टेस्कोच्या ‘स्टार’ या उपक्रमामुळे आता हे शक्य होणार आहे. यात ग्राहकांनी खरेदी केलेल्या आंब्याच्या खोक्यावर संबंधित उत्पादकाचा फोटो व माहिती पत्त्यासह दिली जाईल. या माहितीच्या ग्राहकांना थेट उत्पादकांशी संपर्क साधता येणार आहे. ग्राहकांना खोक्यासह एक पोस्टकार्डही दिले जाईल. यावर आंब्याबाबतचा अभिप्राय उत्पादकांना कळवता येणार आहे.

टॅग्स :हापूस आंबाआंबाकोकण