Join us

कोचर पती-पत्नी व धूत यांच्या परदेशी जाण्यावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 05:23 IST

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांनी परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, यासाठी सीबीआयतर्फे लुकआऊ ट नोटिस आॅफ सर्क्युलर

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांनी परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, यासाठी सीबीआयतर्फे लुकआऊ ट नोटिस आॅफ सर्क्युलर काढण्यात आली आहे.तसे देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांना तपास यंत्रणेतर्फे कळवण्यात आले आहे. या नोटिसमुळे संबंधित व्यक्तीस पासपोर्ट असूनही देशाबाहेर जाता येत नाही.आर्थिक हितसंबंधांचा परिणामआयसीआयसीआयने धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनीला दिलेले कर्ज तसेच चंदा कोचर यांचे पती दीपक व दीर राजीव यांचे धूत व त्यांच्या कंपन्यांशी असलेले आर्थिक हितसंबंध उघड झाल्यामुळे सीबीआय चौकशी करीत आहे. त्यामुळेच ही नोटिस काढण्यात आली आहे.

टॅग्स :चंदा कोचरआयसीआयसीआय बँक