Join us  

एका क्षणात ९०० कर्मचाऱ्यांना कामावर काढणारा आठवतोय का? विशाल गर्गबाबत नवी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 9:35 PM

विशाल गर्गबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. पण विशाल गर्ग कोण आहे इथंपर्यंतचा प्रवास त्याने कसा केला याबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली – विशाल गर्ग नावाच्या व्यक्तीबाबत कदाचित तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही. गर्ग तेच आहेत ज्यांनी एका झूम कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं. त्यानंतर विशाल गर्ग यांच्यावर जगभरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कंपनीने विशाल गर्ग यांच्यावर कारवाई केली होती. गर्ग यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं.

आता सुट्टी संपल्यानंतर विशाल गर्ग (Vishal Garg) पुन्हा कामावर परतला आहे. परंतु कंपनीत काम करणाऱ्यांमध्ये विशाल गर्ग नावाची दहशत बसली आहे. विशाल गर्गबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. पण विशाल गर्ग कोण आहे इथंपर्यंतचा प्रवास त्याने कसा केला याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशाल गर्ग यांच्या जन्माबाबत ठोस माहिती नाही परंतु असा दावा केला जातोय की, १९७७ की ७८ मध्ये विशाल गर्गचा जन्म भारतात झाला. त्यानंतर ते न्यूयॉर्कला गेले.

१० वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये न्यूयॉर्क यूनिवर्सिटीतून फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेसचं शिक्षण घेतले. या शिक्षणादरम्यान, विशाल गर्ग यांनी My Rich Uncle नावाची इन्वेस्टमेंट कंपनी सुरु केली. त्यानंतर २०१४ मध्ये बेटर डॉट कॉमची सुरुवात झाली. ते या कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ होते. ही कंपनी होम लोनसह अन्य प्रकारच्या सुविधा देते. विशाल झीरो कॅपिटलचे फाऊडिंग पार्टनर आहेत. विशाल गर्ग यांनी याआधीही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं आहे.

ज्या व्हिडीओमुळे विशाल गर्ग चर्चेत आले त्यानंतर ते खूप रडल्याने चर्चेत आले. झूम कॉलवर गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना मूर्ख डॉल्फिनची गँग असं बोलले होते. त्याआधी विशालने बिझनेस पार्टनर रजा खानला जिवंत जाळण्याची धमकी दिल्यानेही वादात अडकले होते. विशाल गर्ग आणि वाद हे समीकरण त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आहे. विशाल गर्ग त्यांचे आयुष्य खूप लग्झरी जगतात. ज्या घरात ते राहतात त्या घराचं भाडे महिन्याला १३ लाख रुपये आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. कोरोना काळात विशाल त्यांच्या दर्यागिरीमुळे चर्चेत आले होते. विशालने न्यूयॉर्क पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावं यासाठी २० लाख डॉलर डोनेशन दिले होते.