Join us  

क्रेडिट कार्डच्या वापर केल्यास मिळतात हे 6 मोठे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 4:49 PM

क्रेडिट कार्ड देणाऱ्या बॅंकेकडून या पर्यायी ऑफर दिल्या जातात. क्रेडिट कार्डचे अनेक फायदे असतात. चला जाणून घेऊया काही 6 फायदे....

मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्डचे ऑफर नेहमी मिळत असतात. फ्रि कार्ड ते प्रिमिअम कार्डपर्यंत या ऑफर असतात. यातील अशा कितीतरी ऑफर तुम्हाला माहितीही नसतील. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बॅंकेकडून या पर्यायी ऑफर दिल्या जातात. क्रेडिट कार्डचे अनेक फायदे असतात. चला जाणून घेऊया काही 6 फायदे....

शॉपिंग रिवार्ड्स

ऑनलाईन शॉपिंग या विश्वात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या आकर्षक ऑफर दिल्या जातात. वेगवेगळे डिस्काऊंटही दिले जातात. पण या ऑफर्सचा लाभ घेताना अशीच खरेदी करा जी तुमच्या बजेटमध्ये आहे. युटिलिटी बिल पे करण्यासाठी, फ्यूल खरेदी करण्यासाठी, किराणा भरण्यासाठी, सिनेमाचं तिकीट खरेदी करण्यासाठी या कार्डचा वापर करु शकता. 

एअरपोर्ट लाऊन्ज फॅसिलिटी

एअरपोर्ट लाऊन्ज, फ्लाइट डिले आणि रिशेड्यूल दरम्यान हैराण झालेल्या प्रवाशांसाठी क्रेडिट कार्ड फार फायद्याचं ठरतं. पण प्रत्येकालाच लाऊन्जचा अॅक्सेस मिळत नाही. काही लाऊन्जमध्ये केवळ सदस्यांनाच प्रवेश मिळतो. तर काही लाऊन्जमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. 

क्रेडिट कार्ड स्कोर तयार करण्यात मदत

हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा एक महत्वपूर्ण लाभ आहे. हे खरंतर एक असुरक्षित कर्ज साधन आहे, त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्डचा काळजीपूर्वक वापर केल्यास आणि वेळेवर बिल भरल्यास चांगला क्रेडिट स्कोर तयार होतो. पण वेळेवर बिल न भरल्यास तुमच्या क्रेडिट स्कोरचं नुकसान होऊ शकतं. 

परचेस प्रोटेक्शन

क्रेडिट कार्ड तुमच्या ऑनलाईन शॉपिंगला सुरक्षित करतं. जर तुम्ही एखादं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्रे़डिट कार्डचा वापर करत असाल तर प्रॉडक्ट बेकार झाल्यास किंवा हरवल्यास परचेस प्रोटेक्शन क्लॉजचा लाभ घेऊ शकता. पैसे क्लेम करण्यासाठी एक एफआयआर नोंदवावा लागेल. त्यासोबतच खरेदी केलेल्या कामाची पावतीही द्यावी लागू शकते.  

प्राईस प्रोटेक्शन कव्हर

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर विक्रेत्याकडून प्रॉडक्टची किंमत घटवली जाते. जर तुम्ही प्राइस प्रोटेक्शन देणाऱ्या क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्याच शॉपिंग पोर्टलच्या प्रिंटेड जाहीरातीसोबत 7 दिवसांच्या आत कंपनीला एक रिपोर्ट पाठवा. 

क्रेडिट कार्ड विम्याची सुविधा

क्रेडिट कार्ड तुम्हाला कंसीयर्ज सर्व्हिस, बिग तिकीट परचेससाठी ईएमआय फॅसिलिटी इत्यादी सुविधाही मिळतात. अनेक क्रेडिट कार्ड, इन्श्युरन्स बेनिफिटही मिळतात. त्यामुळे कोणतही क्रेडिट कार्ड घेताना आधी त्याच्यासोबत मिळणारे लाभही जाणून घ्या.

टॅग्स :डिजिटलव्यवसाय