Join us

खरीप पिकांवर किडींचे आक्रमण!

By admin | Updated: September 2, 2015 00:07 IST

खरीप पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले असून, भुरके सोंडे यांचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. यातील काही किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी

अकोला : खरीप पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले असून, भुरके सोंडे यांचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. यातील काही किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध केली आहेत; परंतु शेतकऱ्यांना कीटकनाशक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पावसाअभावी मेटाकुटीस आलेल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर आता हे नवीन संकट कोसळले आहे.पावसाअभावी पिकांवर किडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम विदर्भात ३१ लाख २३२ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली. यात कापूस व सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे किडींनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांवर आक्रमण केले आहे. सद्यस्थितीत खरीप पिकावर भुरक्या सोंड्याचा (मायलोसेरस सोंडे, मॅकुलॅसस डेसबर) प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही कीड बहुभक्षी असून, पीक फुलावर येईपर्यंत ती असते. सध्या या सोंड्याचा मुक्काम कापूस, सोयाबीन, भेंडी, अंबाडी, मका, ऊस, तूर, रांगी, बाजरी, आंबा, बोर, स्ट्रॉबेरी, डाळिंब, सफरचंद, पीयर, पीच सिसम या पिकांवर आहे. ही कीड पिकांचे पाने कडेने कुरतुडून खातात, त्यामुळे पानाला नागमोडी आकार येऊन पाने कंगोऱ्यासारखे नक्षीदार दिसतात. हे सोंडे वाढलेल्या कपाशीच्या पात्या, फुले व कोवळ््या बोंड्यांना नुकसान करतातच शिवाय खाद्य वनस्पतीच्या मुळावर हल्ला करू न मुळ््या खातात. कपाशीमध्ये अळ््यांचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे वाळतात. या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यासाठीची घोषणा केली आहे. परंतु शेतकऱ्यांना अनुदानावर कीटकनाशके मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.