नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या शासकीय एअर इंडियाच्या विमानातील केबिनमधील कर्मचारी यापुढे खादीचे कपडे परिधान करणार आहेत. भारतीय बनावटीच्या खादीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अखत्यारीत असलेल्या खादी ग्रामोद्योग भवनाला या संदर्भात अगोदरच एक कंत्राट देण्यात आले आहे. महिला कर्मचारी सिल्क साडी नेसतील तर पुरुष कर्मचारी जोधपुरी बंद गळा कोट, ट्राऊझर्स आणि जॅकेटस् परिधान करतील. अर्थात हे सर्व कपडे खादीचेच असतील.
‘एअर इंडिया वन’चे कर्मचारी खादीत!
By admin | Updated: March 24, 2016 00:31 IST