Join us  

खादी ग्रामोद्योग शेअर बाजारात सूचिबद्ध करणार - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 5:34 AM

लघु उद्योगांना चालना देण्यासाठी केद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या १0 लघु उद्योगांना शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली.

नवी दिल्ली : लघु उद्योगांना चालना देण्यासाठी केद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या १0 लघु उद्योगांना शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली. यामुळे खादी ग्रामोद्योगाचे अर्थकारण त्यामुळे बदलेल, असे त्यांनी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सांगितले.अर्थ मंत्रालयाकडे त्यासाठी १० हजार कोटी रुपये मागितल्याचे सांगून नितीन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योगचा शेअर गुंतवणूकदारांना खरेदी करता येईल व यामुळे लघुद्योग मंत्रालयाचा आर्थिक चेहरा-मोहरा त्यामुळे बदलेल, असा विश्वासही व्यक्त केला. नितीन गडकरी म्हणाले की, एका युनिटची (उद्योग) निवड करून नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ते सूचिबद्ध केले जाईल. खादीसारखा लघुद्योग त्यामुळे भांडवली बाजारात येईल. त्यासाठी खादी ग्रामोद्योगांच्या एकूण समभाग खरेदीत दहा टक्के रक्कम केंद्र सरकार देईल. ही योजना निधीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे.लघू उद्योगांना लागणार नाही बँकांचे कर्जज्या लघुद्योगांमध्ये निर्यातक्षम उत्पादन निर्मितीची क्षमता आहे अशांना याचा जास्त लाभ होईल. खादी ग्रामोद्योगाला समभाग विक्रीतून मोठी रक्कम मिळेल.खादी इंडियाचा १० रुपयांचा एक शेअर भविष्यात ४० रुपयापर्र्यंत वाढल्यास केंद्राचाही लाभ होईल. लोकांना अल्प गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. उलाढाल जशी वाढेल, तसा लाभांशही वाढेल. त्यामुळे लघुद्योगांना बँकेकडून कर्ज काढण्याची वेळ येणार नाहीजागतिक बँकेने केली सूचनाभांडवली बाजारात लघुद्योगांना सूचिबद्ध करण्याची सूचना जागतिक बँकेने केली आहे. आशिया खंडातील 'पॉवर सेंटर' असलेल्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेनेही हाच आग्रह धरला होता. लघु उद्योगांना उत्पादन वाढ व भांडवली बाजारातूनच नफा कमवावा लागेल, असेही गडकरी यांनी नमूद केले.

टॅग्स :नितीन गडकरीखादीव्यवसाय