Join us  

नशीब फळफळलं, केरळमधील दाम्पत्याला 3.3 कोटी रुपयांचा लागला बंपर जॅकपॉट 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 11:25 AM

lottoland online : या लॉटरीमधून केरळमधील शाजी मॅथ्यू आणि त्यांच्या पत्नीने 3.3 कोटी रुपये जिंकले आहेत. 

नवी दिल्ली : 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़ के’ ही म्हण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी असाच एक प्रकार समोर आला आहे. केरळमधील एक दाम्पत्याला लोटोलँडचा (Lottoland) पहिला जॅकपॉट लागला आहे. आशियामधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या लोटोलँडने (Lottoland) आपला पहिला जॅकपॉट जाहीर केला आहे. या लॉटरीमधून केरळमधील शाजी मॅथ्यू आणि त्यांच्या पत्नीने 3.3 कोटी रुपये जिंकले आहेत. (Lottoland announced their first jackpot winner, Shaji Matthew from Kerala, India, who walked away with a massive Rs. 3.3 crore.)

एका मुलाखतीत शाजी यांनी सांगितले की, ज्यावेळी सुरुवातीला ईमेल पाहिला आणि लोटोलँडचा फोन आला, त्यावेळी मला वाटले की, कोणीतरी प्रँक केले आहे. तसेच, एवढ्या मोठ्या रकमेचे तुम्ही काय करणार, असे शाजींला विचारले असता ही रक्कम आपल्या कुटुंबाचे आयुष्य बदलणार आहे, असे त्यांनी सांगितले. शाजी हे पत्नीसोबत असलेल्या ज्वाइंट अकाऊंटमध्ये पैसे ठेवतात. त्यांच्या मुलांसाठी कॉलेजचा फंड साठवणार आहेत. तसेच, नवीन घर बांधत असल्याचेही शाजी यांनी सांगितले.

लोटोलँडच्या प्रतिनिधीने सांगितले की, " आम्ही तुमच्या प्रवासात इतक्या वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे खूप खुश आहोत. काही वेळापूर्वी आम्ही पहिल्या लखपतीला सेलिब्रेट केले आणि आता आम्ही शाजी आणि त्यांच्या कुटुंबासमवेत करोडपतीकडे गेलो आहोत." याचबरोबर, ते पुढे म्हणाले, "आम्हाला कळले आहे की, यामधील काही पैसे खर्च करून शाजी हे त्याच्या गावाजवळ अनाथाश्रम उघडण्याचा विचार करीत आहे. एखाद्याने आपले पैसे अशा प्रकारे खर्च करण्याचा निर्णय घेतल्याचे ऐकून खूप चांगले वाटते." 

दरम्यान, शाजी यांनी लोटोलँडसोबत व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण केली आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. या मुलाखतीत शाजी यांना ज्यावेळी विचारण्यात आले की, लोटोलँडमध्ये सामील झालेल्यांना काय सल्ला द्याल. त्यावेळी शाजी म्हणाले की, "ही जिंकण्याची संधी आहे. वैयक्तिकरित्या मी अजून यापुढेही लॉटरी खेळणे सुरू ठेवणार आहे, खासकरुन जेव्हा या आठवड्यातील पॉवरबॉल जॅकपॉटने 5000 कोटींचा आकडा ओलांडला आहे. मी न खेळता हे गमवू शकत नाही."

अशी वाढली लोटोलँड लॉटरीची लोकप्रियता 2013 मध्ये प्रथमच लोटोलँड लाँच केले गेले. त्यानंतर हे सतत पुढे गेले आहे, ज्यामध्ये लोक ऑनलाइन लॉटरी खेळतात. अमेरिकेची मेगामिलियन्स आणि पॉवरबॉल 1 अब्ज डॉलर जॅकपॉटच्या पलीकडे जाऊ शकते. 2018 मध्येच दक्षिण कॅरोलिनामधील एका व्यक्तीला 1.6 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 8,000 कोटींची लॉटरी मिळाली. प्रथमच या लॉटरींमध्ये लोटोलँडद्वारे अॅक्सेस दिला केला जाऊ शकतो. मेगामिलियन्स आणि पॉवरबॉल लॉटरीने 5,000 कोटींचा आकडा पार केला आहे. या दोन सोडती या आठवड्यात शनिवार आणि रविवारी काढल्या जात आहेत.