Join us
Daily Top 2Weekly Top 5

केनस्टारचा अ‍ॅमेझॉनशी करार

By admin | Updated: January 28, 2015 00:10 IST

गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या केनस्टार कंपनीने भारतीय बाजारपेठेत वातानुकूलित यंत्रांची (एअर कन्डिशनर) मालिका सादर करतानाच याच्या वितरणाकरिता अ‍ॅमेझॉन कंपनीशी करार

मुंबई : गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या केनस्टार कंपनीने भारतीय बाजारपेठेत वातानुकूलित यंत्रांची (एअर कन्डिशनर) मालिका सादर करतानाच याच्या वितरणाकरिता अ‍ॅमेझॉन कंपनीशी करार केलाआहे. केनस्टार कंपनीचे अध्यक्ष राहुल सेठी म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे एसी मशीनच्या मागणीतही वाढ होताना दिसत आहे. एसीच्या मार्केटचा अभ्यास केल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही स्प्लीट कॅटेगरीमध्ये चार मॉडेल सादर केली आहेत. यांना बीईई स्टार मानांकनही प्राप्त झाले असून थ्री ते फाईव्ह स्टार असे रेटिंग मिळाले आहे.