Join us  

करनीती भाग-३0२ - ‘आयटीआर’ अंतर्गत कोणती नवीन माहिती द्यावी लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 2:30 AM

जर निव्वळ कृषी उत्पन्न्न रु. ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ मध्ये, प्रत्येक कृषी जमिनीविषयी पुढील माहिती द्यावी लागेल.

उमेश शर्मा । सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सप्टेंबर महिना सुरू झाल्याने इन्कम सीझनसुद्धा सुरू झाला आहे, तर इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) अंतर्गत करदात्याला कोणत्या नवीन माहितीची पूर्तता करावी लागेल?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, प्रत्येक वर्षी सीबीडीटी नवीन आयटीआर फार्म आणत आहेत, त्यात इन्कम रिटर्नमध्ये बदल घडवून करदात्याकडून नवीन माहिती मागत आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही सीबीडीटीने आयटीआरमध्ये नवीन माहिती मागितली आहे.अर्जुन : आयटीआर अंतर्गत कंपनी या करदात्यासाठी कोणती नवीन माहिती मागितली गेली आहे?कृष्ण : अर्जुना, १) नवीन उद्योजक तसेच अनलिस्टेड कंपनी यांना आपल्या भागधारकांची सखोल माहिती द्यावयाची आहे. ती सखोल माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये पुढीलप्रमाणे द्यावी लागेल. नाव, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, धारण केलेल्या भागाचा प्रकार जसे, बोनस भाग, समभाग, अग्रहक्क भाग, अधिकार भाग, भागांची संख्या, भाग वाटपांची तारीख, भागांचे दर्शनी मूल्य, भागांची जारी किंमत, मिळालेली रक्कम, समभागधारकांनी शेअर्स विकले किंवा सोडले तर समाप्तीचा तपशील.२) एकूण उलाढालीसंबंधीची माहिती जीएसटी रिटर्नअंतर्गत गेली आहे, तसेच जीएसटी नंबर, एकूण पुरवठ्याची वार्षिक रक्कम जी आधी आयटीआर - ४मध्ये देण्याकरिता मर्यादित होती ती आता आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ साठी आवश्यक आहे.३) कंपनीला संपूर्ण मालमत्ता तसेच देयाची माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये द्यावयाची आहे ती खालीलप्रमाणे. जमीन आणि इमारत, लिस्टेड तसेच अनलिस्टेड समभागांची माहिती, कंपनीने केलेल्या इतर गुंतवणुकीची माहिती, दुसऱ्या व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीची माहिती, कंपनीने दिलेल्या लोन किंवा आगाऊ रकमेची माहिती, कंपनीच्या वाहनांची व बोट्स इत्यादीची माहिती, दागिने, सोने-चांदी, कलाकृती यांची माहिती, देयाची माहिती (वित्तीय संस्था सोडून).अर्जुन : आयटीआर अंतर्गत कंपनी वगळता इतर कोणती नवीन माहिती मागितली गेली आहे?कृष्ण : अर्जुना, आयटीआरअंतर्गत कंपनी वगळता इतर करदात्याला पुढीलप्रमाणे नवीन माहिती मागितली गेली आहे. प्रत्येक व्यापाºयाला आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ मध्ये ज्यांनी खात्याची पुस्तके ठेवली आहेत, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग खाते, ट्रेडिंग खाते आणि नफा व तोटा खाते यांचे संपूर्ण विश्लेषण देणे आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंग खात्यात कच्च्या मालाचा ओपनिंग स्टॉक, वर्क इन प्रोग्रेस, खरेदी, कारखाना खर्च आणि क्लोजिंंग स्टॉक यांचा संपूर्ण तपशील देणे आवश्यक आहे. तसेच उत्पादित वस्तूंंची किंमत ही ट्रेडिंग खात्याला ट्रान्स्फर करावी लागेल. ट्रेडिंग खात्यामध्ये खरेदी-विक्री, डायरेक्ट खर्च, विक्रीस तयार झालेल्या वस्तूंंचा ओपनिंंग आणि क्लोजिंंगचा स्टॉक यांचा संपूर्ण तपशील देणे आवश्यक आहे. ढोबळ नफा हा नफा व तोटा खात्याला ट्रान्स्फर करावा लागेल. नफा व तोटा खात्यामध्ये अप्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च द्यावे लागणार आहे. हे ढोबळ नफा व निव्वळ नफा याला उघड करेल व खात्याच्या पुस्तकांशी सुसंगत करावा लागेल.जर निव्वळ कृषी उत्पन्न्न रु. ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ मध्ये, प्रत्येक कृषी जमिनीविषयी पुढील माहिती द्यावी लागेल. जिल्ह्याचे नाव पिन कोडसह, एकरमध्ये शेतीचे मापन, शेतजमीन मालकीची आहे किंवा भाड्यावर आहे, शेतीची जमीन सिंचनावर किंवा पावसावर अवलंबून आहे का, यावरून पीक पॅटर्न आणि प्रत्येक शेतजमिनीचे उत्पन्न निश्चित करता येईल.वर्षभरात असूचीबद्ध कंपन्यांमधील इक्विटी शेअर्स संदर्भात माहिती आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-७ मध्ये सविस्तर द्यावी लागेल. जो करदाता कंपनीत संचालक पदावर आहे त्याला आयटीआर-२ आणि आयटीआर-३ मध्ये त्याचे नाव, कंपनीचे पॅन, त्याचे सूचीबद्ध आणि असूचीबद्ध शेअर्स आणि डीआयएन द्यावा लागणार आहे.जो करदाता आयटीआर-२ आणि आयटीआर-३ दाखल करत असेल तर त्याला त्याच्या रहिवासी स्थितीचे संपूर्ण सादरीकरण देणे आवश्यक आहे. म्हणजेच करदाता वर्षातून १८२ दिवस किंवा जास्त भारतात निवासी होता का आणि ३६५ दिवस किंवा जास्त मागील ४ वर्षांमध्ये भारताचा निवासी होता का, हे करदात्याचे रहिवासी स्थिती व करपात्रता निश्चित करण्यासाठी मदत करेल. आता आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ भरणाºया करदात्यालाही जीएसटी नं. आणि जीएसटी रिटर्ननुसार दाखवलेली उलाढालीची माहिती द्यायची आहे. आता पगार उत्पन्नाच्या अहवालात बदल झाला आहे. पूर्वी केवळ करपात्र भत्त्यांचा अहवाल दिला जात होता. आता संपूर्ण पगार, सवलत भत्त्याची कपात आणि करपात्र पगार यांचा अहवाल देणे आवश्यक आहे. आणखी १६ विभागांतील कपातीचा वेगवेगळा अहवाल देणे आवश्यक आहे. हे सादरीकरण फॉर्म १६ सोबत माहिती देईल.

 

 

टॅग्स :इन्कम टॅक्स