Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासदरालाही मागे टाकण्याची कर्नाटकची क्षमता

By admin | Updated: February 5, 2016 03:21 IST

कर्नाटककडे असलेली बौद्धिक संपदा, कुशल कर्मचारीबळ, गुंतवणूकप्रिय धोरण यामुळे आगामी काळात कर्नाटक राज्याचा विकास हा देशाच्या विकासापेक्षा कमीत कमी

बंगळुरू : कर्नाटककडे असलेली बौद्धिक संपदा, कुशल कर्मचारीबळ, गुंतवणूकप्रिय धोरण यामुळे आगामी काळात कर्नाटक राज्याचा विकास हा देशाच्या विकासापेक्षा कमीत कमी २ ते ३ टक्के अधिक असेल, असे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. कर्नाटक राज्यात गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्यासाठी आणि राज्याची माहिती देण्यासाठी गुरुवारपासून ‘ग्लोबल इन्व्हेस्टर मीट’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जेटली यांच्याहस्ते झाले. जेटली म्हणाले की, कर्नाटक राज्यात शिक्षणाचे प्रमाण, तंत्रज्ञानाकडे असलेला त्यांचा ओढा आणि उद्योजगकता आदी घटकांचा कर्नाटक राज्याला विकासात नेहमीच उपयोग झाला आहे. याच घटकांमुळे गेल्या दोन ते तीन दशकात कर्नाटकाचा विकास झपाट्याने झाला आहे. ही या राज्याची खरी ताकद आहे. याचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून हे विचारात घेता आगामी काळात या राज्याचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा किमान दोन ते तीन टक्क्यांनी अधिक होऊ शकते, असे गौरवौद्गार जेटली यांनी काढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या राज्याचे योगदान मोठे आहे. परंतु, आता या राज्याने उत्पादनक्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. तसेच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राकडेही लक्ष दिल्यास त्याचा फायदा राज्याला आणि पर्यायाने देशाला होऊ शकतो. अस्थिरतेचा भारताला धोका कमीजागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा स्थितीचा सामना करत त्यातून बाहेर येण्याची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे.जागतिक अर्थकारणातील या अस्थिरतेचा फटका भारताला फारसा बसला नसून भारताच्या विकासाची प्रक्रिया सुरूच राहिल मात्र, तरीही सावधानता बाळगली असल्याचे जेटली म्हणाले. अस्थिरता हा आता जागतिक अर्थकारणाचा स्थायीभाव झाल्याचे सांगतानाच आगामी दोन ते तीन वर्ष ही स्थिती कायम राहिल असे विश्लेषण जेटली यांनी केले.