Join us

नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कांत

By admin | Updated: December 30, 2015 01:43 IST

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) १९८० च्या तुकडीचे अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) १९८० च्या तुकडीचे अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने मंगळवारी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.कांत हे सिंधूश्री खुल्लर यांच्याकडून पदभार स्वीकारतील. खुल्लर येत्या ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. कांत हे औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाचे सचिव असून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुढील आदेशापर्यंत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय मित्रा यांना मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयात सचिव बनविण्यात आले आहे. ते विजय छिब्बर यांची जागा घेतील. छिब्बर ३१ डिसेंबरला निवृत्त होत आहेत. नीरजकुमार गुप्ता यांची आराधना जोहरी यांच्या जागी निर्गुंतवणूक विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. जोहरी यापुढे नॅशनल अथॉरिटी फॉर केमिकल वेपन्स कन्व्हेंशनचे अध्यक्षपद सांभाळतील. रश्मी शर्मा यांना वस्त्रोद्योग मंत्रालयात सचिवपदी पाठविण्यात आले असून त्या संजयकुमार पांडा यांच्या जागी काम करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)