Join us

कल्याण कृष्णमुर्ती फ्लिपकार्टचे नवे सीईओ

By admin | Updated: January 9, 2017 22:20 IST

इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमुर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमुर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून बिन्नी बन्सल यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिन्नी बन्सल यांच्यासाठी नव्या पदाची निर्मिती करून त्यांना ग्रुप सीईओ बनवण्यात आलं आहे. व्यवस्थापनेतील पुनर्रचनेअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. 
 
जून 2016 मध्ये टायगर ग्लोबल सोडून  कृष्णमुर्ती  हे फ्लिपकार्टमध्ये आले होते. वाणिज्य प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  टायगर ग्लोबल  फ्लिपकार्टमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आहे. 
 
गेल्या वर्षीही फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये बदल करण्यात आले होते. सचिन बन्सल यांच्याजागी बिन्नी बन्सल यांना सीईओ बनवण्यात आलं होतं. कार्यकारी अध्यक्ष पदामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसून सचिन बन्सल हेच पदभार सांभाळतील.