कदंब पास जोड
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST
ग्रामीण भागातील प्रवाशांना मासिक पास घेऊनही कदंब गाड्या मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते. कदंबची पास योजना ही पासधारक प्रवाशांची वेगळीच डोकेदुखी बनू लागली आहे.
कदंब पास जोड
ग्रामीण भागातील प्रवाशांना मासिक पास घेऊनही कदंब गाड्या मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते. कदंबची पास योजना ही पासधारक प्रवाशांची वेगळीच डोकेदुखी बनू लागली आहे.काही प्रवाशांच्या अनुभवाप्रमाणे पिर्णहून पणजी येथे जाण्यासाठी सकाळी मिनी कदंब गाडी लावण्यात आली आहे. या भागात पणजीला जाणारे बरेच प्रवासी असतात. मिनी बसगाडी या मार्गावरील प्रवाशांना पुरत नाही. त्यामुळे पिर्ण व जवळपासच्या भागातील प्रवाशांनी कदंब महामंडळाला अतिरिक्त बस सेवा देण्याबाबत निवेदन दिले आहे. महामंडळाला अनेकदा दूरध्वनीद्वारे समस्या कळविण्यात आली; पण अजूनही या समस्येवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. ज्या मार्गावर पुरेशा बसगाड्या सोडण्यास महामंडळाला शक्य होत नाही, त्या ठिकाणची पास सेवा रद्द करावी. अन्यथा पास काढणार्या प्रवाशाला दुहेरी भुर्दंड पडतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सेवा अधिक उपयोगी पडते. त्यामुळे जवळील अंतरावरील पासधारकांचे पास बंद करून लांबच्या मार्गाने येणार्या प्रवाशांसाठीच ही योजना राबविण्यात यावी व अधिकार्यांनी योग्यरीत्या अंबलबजावणी करावी, अशी मागणी काही प्रवाशांतर्फे होत आहे. ......प्रवाशांची मते...सरकारी अधिकार्यांना पास योजनेतून वगळावेदूरच्या प्रवाशांनाच पास योजना देण्यात यावी