Join us

आॅनलाईन ट्रेडिंग’वर अंकुश ठेवणार- जैन

By admin | Updated: April 20, 2015 00:05 IST

ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल होऊ घातले असून ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला अधिक सक्षम करण्याबरोबरच ‘आॅनलाईन ट्रेडिंग’ या सध्याच्या प्रचलित

पुणे : ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल होऊ घातले असून ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला अधिक सक्षम करण्याबरोबरच ‘आॅनलाईन ट्रेडिंग’ या सध्याच्या प्रचलित मार्केटिंगवर अंकुश ठेवण्याचीही त्यात महत्त्वाची तरतूद असणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी रविवारी येथे दिली.देशात सध्या १९८६ सालचा ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आहे. त्यात अनेक सुधारणा होणे आवश्यक असून त्यादृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ग्राहक संरक्षण कायदा थेट सामान्य लोकांशी जोडलेला आहे. त्यामुळे हा कायदा सक्षम असणे आवश्यक आहे. १९८६ च्या कायद्यात मोठे बदल केले जाणार आहेत, असे जैन म्हणाले.