Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदाणीच्या कर्जावर तीन महिन्यांत फैसला

By admin | Updated: December 8, 2014 02:02 IST

अदाणी उद्योग समूहाला द्यावयाचा १ अब्ज डॉलरच्या (६,२00 कोटी रुपये) वादग्रस्त कर्जाविषयीचा अंतिम निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाकडून आगामी तीन महिन्यांच्या काळात घेतला जाईल.

नवी दिल्ली : अदाणी उद्योग समूहाला द्यावयाचा १ अब्ज डॉलरच्या (६,२00 कोटी रुपये) वादग्रस्त कर्जाविषयीचा अंतिम निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाकडून आगामी तीन महिन्यांच्या काळात घेतला जाईल. आॅस्ट्रेलियातील खाणींसाठी अदाणीला एसबीआयने हे कर्ज मंजूर केले आहे. वाद निर्माण झाल्यानंतर हे कर्ज वितरित करण्यात आलेले नाही. बँकेची सर्वोच्च कार्यकारी समिती यावर अंतिम निर्णय घेईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या काळात एसबीआयने अदाणी समूहासोबत या कर्जाविषयीचा करार केला होता. बँकेच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, कार्यकारी समिती गहन विचारविमर्ष करून अदाणीच्या कर्जावर अंतिम निर्णय घेईल. सध्या या कराराच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जात आहे. ज्या प्रकल्पासाठी हे कर्ज देण्यात आले, त्याचाही अभ्यास केला जात आहे. यात साधारणत: दोन ते तीन महिने लागतील. त्यानंतरच कर्जाला अंतिम मंजुरी दिली जाईल. ४00 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जाला बँकेच्या चेअरमनच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती अंतिम मंजुरी देते. या समितीत दोन कार्यकारी संचालक तसेच जेथे बैठक होत असते, तेथील गैर कार्यकारी संचालक असतात. याशिवाय रिझर्व्ह बँकेचाही एक प्रतिनिधी असतो. सध्या डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित आर. पटेल कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. आॅस्ट्रेलियातील आपल्या १६ अब्ज डॉलरच्या कारमाईकल कोळसा खाण प्रकल्पासाठीअदाणीसमूह ३00 कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग उभारीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)