Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमधील नोकऱ्या २५ % वाढणार

By admin | Updated: May 25, 2015 01:10 IST

बँकिंग क्षेत्रात यंदा नियुक्त्यांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. उद्योग जाणकारांच्या मते, अर्थव्यवस्थेतील तेजी, धोरणात्मक पातळीवरील

मुंबई : बँकिंग क्षेत्रात यंदा नियुक्त्यांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. उद्योग जाणकारांच्या मते, अर्थव्यवस्थेतील तेजी, धोरणात्मक पातळीवरील बदल, व्यापारी धारणेतील सुधारणा यामुळे बँकिंग क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये वाढ होईल.पीपलस्टाँगचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज बन्सल यांनी सांगितले की, ‘२०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये बँकिंग क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये २५ टक्के वाढ होईल. जवळपास सर्वच पातळ्यांवर भरती होईल. मात्र, प्रवेश आणि मध्यम व्यवस्थापन पातळीवर सर्वाधिक रोजगार निर्माण होतील.’ नवीन लोक बाजारात आल्याने वरिष्ठ पातळीवरही नव्या संधी उपलब्ध होतील.