Join us  

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पीओ पदासाठी बंपर भरती, अशी आहे निवड प्रक्रिया आणि अटी शर्ती

By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 9:15 PM

SBI PO Recruitment News : स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी भरती प्रक्रिा सुरू केली असून, उमेदवारी अर्ज मागवले आहेत.

ठळक मुद्दे या भरती प्रक्रियेमधून दोन हजार पदे भरली जातीलएकूण दोन हजार पदांमधील ८१० पदे सामान्य वर्गासाठी, ५४० जागा ओबीसी, २०० ईडब्ल्यूएस आणि १५० जागा एससी प्रवर्गासाठी आरक्षितभरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर आहे. तसेच उमेदवारी अर्ज प्रिंट करून घेण्याची शेवटची तारीख ही १९ डिसेंबर २०२० आहे

नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी भरती प्रक्रिा सुरू केली असून, उमेदवारी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर आहे. तसेच उमेदवारी अर्ज प्रिंट करून घेण्याची शेवटची तारीख ही १९ डिसेंबर २०२० आहे.या भरती प्रक्रियेसाठी एसबीआय़ ऑनलाइन प्रिलिमिनरी परीक्षा ३१ डिसेंबर २०२० तसेच २, ४ आणि ५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. तर या परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. या भरती प्रक्रियेमधून दोन हजार पदे भरली जातील. एकूण दोन हजार पदांमधील ८१० पदे सामान्य वर्गासाठी, ५४० जागा ओबीसी, २०० ईडब्ल्यूएस आणि १५० जागा एससी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कुठल्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेकडून मिळवलेली पदवी असली पाहिजे. तसेच ज्या उमेदवारांच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल आलेला नसेल तेसुद्धा या पदासाठी अर्ज करू शकलीत. मात्र मुलाखतीच्या वेळी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत त्यांना पदवीची परीक्षा दिल्याचा पुरावा दिला पाहिजे.या भरती परीक्षेसाठी सामान, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागेल. मात्रा एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. 

 

टॅग्स :नोकरीएसबीआयभारत