Join us  

अंबानींकडून जिओ मार्ट लाँच; अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 7:48 PM

रिलायन्स उद्योग समूहानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण करत जिओ मार्टचं सॉफ्ट लाँच केले आहे.

नवी दिल्लीः रिलायन्स उद्योग समूहानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण करत जिओ मार्टचं सॉफ्ट लाँच केले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दबदबा असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशी जिओ मार्टची थेट स्पर्धा होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण भागात प्रथम जिओ मार्ट सुरू करण्यात येणार असून, 'देश की नई दुकान', अशी त्याची टॅगलाइन आहे. 12 ऑगस्ट 2019ला रिलायन्सनं जिओ मार्ट सुरू करण्याची चाचपणी सुरू केली होती.जिओ मार्टच्या ग्राहकांना 50 हजार प्रकारची घरगुती उत्पादने घरपोच दिली जाणार असून, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जिओ मार्टच्या प्लानबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जिओ मार्टची सेवा आम्ही सुरू केली असून, जिओ ग्राहकांना नोंदणी करण्यासाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिओ मार्ट तीन क्षेत्रांत आपली सेवा देणार असून, त्यानंतर अधिकाधिक क्षेत्रात जिओ मार्टच्या सेवेचा विस्तार केला जाईल, असेही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. दररोजच्या वापरातील वस्तू, साबण, शॅम्पू आणि अन्य घरगुती सामानाच्या विक्रीवर कंपनीचं विशेष लक्ष आहे. चीनमधील अलिबाबा या कंपनीच्या कार्य पद्धतीनुसार स्थानिक दुकानदारांना ऑनलाइन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम रिलायन्स जिओ मार्ट करणार आहे. परंतु जिओ मार्टच्या प्लानबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :जिओ